Ad will apear here
Next
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या रोपांचे वाटप
पुणे : पुण्यातील फोटोग्राफी सायकल क्लब ही संस्था पर्यावरणाच्या अनेक प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे.  याचाच एक भाग म्हणून वटपौर्णिमेचे औचित्य साधून संस्थेतर्फे सहकारनगर येथील पद्मावती माता मंदिरात जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. म्हणूनच वडाची पूजा का करतात, त्यामागील शास्त्रीय कारण काय, झाडे आपणास काय देतात व आपण काय करायला हवे याची शास्त्रीय माहिती संस्थेतर्फे येथील महिलांना समजावून सांगण्यात आली. या दिवशी फोटोग्राफी सायकल क्लब संस्थेतर्फे ५० महिलांना वडाची रोपे वाटण्यात आली. त्यांच्या संगोपनाची प्रतिज्ञा करून महिलांनी खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी केली.

या वेळी फोटोग्राफी सायकल क्लब संस्थेचे अनिल व आशालता साळवी, चेतन साळुंके, तेजस्विनी थिटे, लोकेश व जान्हवी बापट यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नदी-नाले स्वच्छता, वृक्षारोपण व संवर्धन याकरिता जनजागृती, प्लास्टिक कचरा निर्मूलन व स्वच्छता अभियान, सौर यंत्रणा व त्याचे महत्त्व लोकांना सांगणे, ओला कचरा जिरवण्याचे तंत्रज्ञान, अशी अनेकविध पर्यावरणपूरक कामे संस्था गेली अनेक वर्षे करत आहे. संस्थेत अनेक कार्यकर्ते श्रमदान म्हणून काम करत आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZNABD
Similar Posts
फोटोग्राफी सायकल क्लबतर्फे उन्हाळी छंद वर्ग पुणे : येथील फोटोग्राफी सायकल क्लब संस्थेमार्फत मुलांसाठी आयोजित केलेला उन्हाळी छंद वर्ग सिंहगड रोड येथील ‘एस. के. फिटनेस सेंटर व डान्स अकादमी’ येथे नुकताच पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना फोटोग्राफी, म्युझिक, डान्स व ड्रामा यांचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘आजकाल अनेक उन्हाळी शिबीरे घेतली जातात, पण
‘पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी’ पुणे : ‘जागतिक पर्यावरणदिन हा काही उत्सव साजरा करायचा दिवस नव्हे. पृथ्वीचे संरक्षण व पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी सामान्य नागरिक, सरकार आणि कारखाने (उद्योग) यांना पार पाडायची असते. पर्यावरणाचे संरक्षण व त्याच्याप्रति जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य सर्वांनी पार पाडावे. ही आज प्रत्येकाची जबाबदारी बनली पाहिजे
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language